स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड वबिलोली तालुका सकल मराठा समितीच्या वतीने अशोकराव चव्हाण यांना निवेदन

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर


आज 13 जून रोजी महाराष्ट्राचे मा.ना. अशोकरावजी चव्हाण साहेब
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मराठा आरक्षणाचे उपसमितीचे अध्यक्ष
बिलोली तालुका दौऱ्यावर आले असता बिलोली तालुका सकल मराठा समितीच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्यात यावे यासाठी बिलोली तालुक्यातील सर्व सकल मराठा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तसेच महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने एकत्रित येऊन मराठा समाजाला लवकरात लवकर हे सर्व मागण्या मंजूर कराव्यात यासाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील वाडेकर,सामजीक कार्यकर्ते राजू पाटील शिंपाळकर,सामजीक कार्यकर्ते संतोष पाटील आ


तालुका अध्यक्ष दत्ता पाटील जाधव,केदार पाटील ढगे,जिल्हाउपाध्यक्ष माधव पाटील डाकोरे,जेजेराव पाटील कानोले,आधी सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते
खालील मागण्या
१)मराठा समाजाला फक्त आणि फक्त ओबीसी प्रवर्गातुनच आरक्षण द्यावे.
२) माजी न्यायमूर्ती भोसले समितीच्या अहवालावर राज्य सरकारने तातडीचे अधिवेशन घेऊन भोसले समितीने केलेल्या शिफारशी अमलात आणाव्यात.
३) राज्य सरकारने जो नियोजित मागासवर्गीय आयोगावर ज्या लोकांची सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे त्यामध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधींची नेमणूक करावी.
४) मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बोर्डाच्या बरोबरीने सारथी संस्थेला अर्थ पुरवठा करावा.त्यामुळे मराठा तरूण वेगवेगळ्या परीक्षा साठी पात्र ठरतील.
५) मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरपूर निधी उपलब्ध करून द्यावा व त्याद्वारे होणाऱ्या कर्ज प्रकरणातील जाचक अटी (जमीन तारण ठेवणे, आयटी रिटर्न मागणे, ठराविक बँक या कर्जासाठी नेमून देणे) रद्द कराव्यात ज्यामुळे मराठा तरुण उद्योग धंदे करून स्वतःच्या पायावर उभा राहील.
६) जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांना जे लाभ मिळतात ते सर्व लाभ मराठा विद्यार्थ्यांना देण्यात यावेत.
यासाठी निवेदन देण्यात आले