
भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ नूसार समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती, मानवतावाद निर्माण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. आपण देखील अभाअंनिसला लोक चळवळ बनवून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा संघटक अनिल दहागावकर यांनी केले. दिनांक 3 आॕक्टोबरला पोंभुर्णा येथे पत्रकार भवनात दुपारी 1 वाजता अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तालुका शाखा, पोंभुर्णाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून दहागावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. या बैठकीला तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिलीप मॅकलवार,अॅड. रंजित खोब्रागडे,
अभाअंनिसचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले हे प्रामुख्याने उपस्थित होते. ऊपस्थित मान्यवरांनी सुध्दा याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेण्याचे आवाहन केले.
या बैठकीत अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा, पोंभुर्णाचे गठन करण्यात आले. ती कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष-अमित पाल,संघटक- विनोद मारशेट्टीवार, सचिव-प्रशांत झाडे, कोषाध्यक्ष- भोलेनाथ कोवे, प्रसिद्धी प्रमुख-अविनाश वाळके, युवा संघटक-श्रीकांत शेंडे, उपाध्यक्ष-सुकदास खोब्रागडे, महेंद्र शेडमाके, सहसंघटक-विकास रामटेके, सहसचिव-संतोष गेडाम,सदस्य-सुनिल पाल, राजू अर्जूनकार,फुलदास चूधरी, विकास महामंडरे, सल्लागार-दिलीप मॅकलवार, अॅड.रंजित खोब्रागडे. या कार्यक्रमाचे संचालन अविनाश वाळके तर आभारप्रदर्शन अमित पाल यांनी केले.
या बैठकीला पोंभुर्णा व गोंडपिंपरी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
