विज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

(रिधोरा,काटोल)


केंद्र सरकार पुरवित असलेल्या कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावर विज टंचाईचे संकट आले असुन .त्यामुळे शेतकर्यांना थ्री फेज लाईन चे वेळापत्रक गेल्या आठवड्यापासुन सरकारने बदलविलेले आहे.त्यामुळे शेतकर्यांना ओलीतासाठी रात्रीच्या अनेक अडचनीला समोर जावे लागत आहे.शेतकर्यांना जिवीताला धोका उदभवल्यास क जबाबदारी कोन घेइल ? असे संतप्त शेतकरी विचारीत होते.
पंचायत समीती सदस्य संजय डांगोरे आणि काही शेतकरी मिळुन रिधोरा येथील विज वितरन कार्यालयात धडक देवुन विजेचे वेळापत्रक पुर्वी प्रमाने त्वरित करन्याची निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे.
बोरखेडी,कोकर्डा ,खापरी,सावळी,रिधोरा सारख्या अनेक डिपी जळल्यामुळे नादुरस्त असलेल्या डिपी दुरस्ती करावी.शेतकर्यांना विजेच्या बिलाकरीता मुदत आणि काही समप्रमानात भाग पाडुन देन्याचीही निवेदनात मागनी केली आहे.कनिस्ट अभीयंता श्री महेंद्र हेडावु यांनी त्वरीत कार्यवाही करीता वरिस्ठांना कळविलेले आहे.
संजय डांगोरे यांचे समवेत प्रविन टालाटुले,वामनराव मोहड,मनोज तभाने,रवि तरटे,किशोर महल्ले,प्रविन काळे,भुषन मुसळे,खुषाल वाहने,मनोहर मोहड,गजेंद्र मुसळे,मंगेश तांबुसकर,चंद्रशेखर पवार,खुषाल काळे,यादव डांगोरे ,धनराज उमाळे,आदी शेतकरी उपस्थीत होते.