वडकी पोलीस स्टेशनला 3 नवीन वाहने,ठाणेदार विनायकराव जाधव यांची माहिती

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी पोलिस स्टेशनला नुकतेच नवीन 1 चारचाकी वाहने, आणि 2 दुचाकी वाहने देण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलिसांना गस्त घालताना मदत होणार आहे.येथील पोलिस स्टेशन चा भौगोलिक विस्तार पाहता याठिकाणी मिळालेली शासकीय वाहनांची संख्या देखील काम करण्यासाठी अपुरी पडत आहे. पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 5 बीट आहे या क्षेत्रातदैनंदिन घडणारे अपघात, आपत्ती, एखादी महत्त्वाची घटना घडून आल्यास याठिकाणी लवकर पोहचण्यासाठी शासकीय वाहन उपलब्ध असेल याची निश्चित खात्री राहत नाही. अशा परिस्थिती मध्ये वेळीच मदतकार्य करणे शक्य होतं नाही. आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी जाऊन तात्काळ मदतकार्य करण्यासाठी

वडकी पोलिस स्टेशनमध्ये नवीन 1 चारचाकी वाहने, आणि 2 दुचाकी वाहन नुकतेच देण्यात आली आहे. पोलिस स्टेशन च्या हद्दीत एखादी घटनाअथवा दुर्घटना घडल्यास त्यासंदर्भात माहिती तात्काळ ११२ नंबर डायल करताच कंट्रोल रुम वरुन घटनास्थळी मदतीला उपलब्ध वाहन होते. त्यामुळे मदतकार्य करतांना कसलाही विलंब होत नाही. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनीघाबरून न जाता मदत प्राप्त करण्यासाठी ११२ नंबर डायल करावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व पोलिस निरीक्षक विनायक जाधव तथा पोलिस प्रशासनाच्या वतीने केले आहे.