सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य राळेगाव महिला तालुकाध्यक्षा पदी सौ. लताताई गजाननराव घोटेकर यांची नियुक्ती करण्यात आली

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी वारा येथील सरपंचा सौ. लताताई गजाननराव घोटेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तमराव घोगरे, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब मस्के, राज्य सचिव सुनीलजी रहाटे, राज्य संपर्क प्रमुख राहुलजी उके, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य महिला उपाध्यक्षा सौ वंदनाताई गुंजाळ, राज्य महिला संघटिका सौ ज्योती ताई औगड, राज्य सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, राज्य कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, राज्य निरीक्षक राजकुमार मेश्राम, राज्य संघटक अण्णासाहेब जाधव, राज्य सल्लागार हनुमंतराव सुर्वे, राज्य प्रसिद्ध प्रमुख मंगेशराव तायडे, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख रामनाथ बोहाडे, राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे, राज्य कोषाध्यक्ष सदाशिवराव ढेंगे, राज्य कोर कमिटी सदस्य सतीशजी चहाटे , राज्य सदस्य प्रवीणभाऊ शहाणे, भाऊसाहेब गिराम, सतीशजी साखरे अविनाशजी गावंडे, प्रसादजी पाटील, सागरजी कळसकर कपिलजी देवके किशोरभाऊ धामंदे हे उपस्थित होते.
सौ.लताताई गजाननराव घोटेकर ग्रामपंचायत वारा ता.राळेगाव जि. यवतमाळ यांची सरपंच सेवा महासंघ राळेगाव महिला तालुकाध्यक्षा पदी दि 23/10/2021 रोजी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे श्रेय तालुका अध्यक्ष अंकुशभाऊ मुनेश्वर, तालुका सचिव राजूभाऊ तेलंगे, सरपंच सुधीरभाऊ जवादे, किशोर भाऊ धांमदे , मोहनभाऊ नरडवार, व इतरही सरपंचांना देण्यात येत आहे.