गांधी उद्यान योग वरोरा यांना नितीन जी गडकरी यांच्याकडून ऍम्ब्युलन्स भेट,लोकार्पण सोहळा संपन्न


दिनांक 1नोव्हेंबर 2021 सकाळी १०.०० वाजता गांधी उद्यान योग मंडळ वरोरा चे गुढीपाडवा महोत्सव, योग दिवस,कोविड काळात दिलेली स्वर्गरथ सेवा,ऑक्सीजन ब्रिगेड चे चे कार्याची समीक्षा करून केंद्रीय मंत्री भारत सरकार मा. नीतिनजी गडकरीसाहेब यांनी भेट दिलेल्या M G HECTOR CARDIAC AMBULANCE चा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम आंबेडकर चोक येथे संपन्न झाला.त्यावेळी
उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकडोजी नागपूर विद्यापिठाचे सिनेट सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते वामनजी तुर्के होते. तसेच योगगुरू श्री प्रकाशजी संचेती व जेष्ठ योग साधक ज्ञानचंदजी मालू व डॉ•हेमलता खापणे यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून लोकार्पण करण्यात आला. त्यावेळी उपस्थित गांधी उद्यान योग वरोरा सर्व सदस्य उपस्थित होते. जनसेवा हिच खरी ईश्वरसेवा या माध्यमातून गडकरी साहेब समाजसेवा करत असतात या ऍम्ब्युलन्स मुळे वरोरा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला लाभ घेता येईल असे वामनजी तुर्के यांनी म्हटले