
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात चोरीचे सत्र अव्याहत सुरु आहे. तालुक्यातील पिपळखुंटी येथे एकाचं रात्री तब्बल तीन ठिकाणी चोरटयांनी हात साफ केले. दोन घर चोरटयांनी फोडली. त्याच रात्री शेतातील तीन क्विंटल सोयाबीनची देखील चोरी केली.
फिर्यादी त्रेंबक दगडुजी डोंगरे रा. पिंपळखुटी यांनी राळेगाव पोलीस स्टेशनंला या बाबत तक्रार दिली आहे. यात दोन लाख 87 हजार रुपये व मुद्देमालावर चोरटयांनी हात साफ केले. या बाबत यवतमाळ येथील स्वानपथक आज घटनास्थळी दाखल झाले होते. या आधी राळेगाव शहरात चोरीच्या अनेक घटना घडल्या. चोरट्यांचे मनोबल चांगलेच वाढलेले दिसते. अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे.
