विजेच्या लपंडावामुळे राळेगाव तालुकातील जनता त्रस्त ! राजकारणी मस्त ! कर्मचारी सुस्त !

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील विजेच्या लपंडावामुळे जनता त्रस्त झाली आहे.दिवसातुन अनेक वेळा विज गायप असतात अनेक वेळा रात्री सुध्दा रात्रभर विज गायप असतात आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे.कुलरला सुध्दा उष्णता मानत नाही,जर दिवसभर रात्री विज जर नसली तर जनतेचे काय हाल होतात.

हे दर पाच वर्षांनी मतदान मागणारे नेतेमंडळींला दिसत नाही का, अनेक राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या वेळी जनतेला अनेक वेळा आश्वासन देतात मात्र निवडणूक झाली कि विसरून जातात, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येवू द्या नेते मंडळींच्या चकरा मारणे चालू होतात मात्र आता जनता विजेच्या त्रासाने त्रस्त झाले तर कोणी ढुंकूनही पाहत नाही, वरीष्ठ अधिकारी यांना विजेबदल फोनवर वरून विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात..

मला माहित नाही,मि विचारून सांगतो,मि मिटिंगमध्ये आहे,मिआॅफरेटर ला विचारतो असे उत्तरे सामान्य जनतेला मिळतात .जर वरीष्ठाना विज कोठुन गेली हे जर माहिती नाही तर सामान्य जनतेन करायचे काय.?

सामान्य जनतेच्या वाली कोणी नाही का, राजकीय नेते मंडळींला जनतेचे घेणे देणे नाही का, राळेगाव परिसराततील जनता विजेमुळे त्रासली आहे तरी वरीष्ठ अधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्यात यावे अशी जनतेची अपेक्षा आहे..