
वरोरा शहराला 179 खेडेगाव जोडले असल्याने या सर्व खेड्यातून अनेक नागरिक शेतीच्या कामासाठी ,बाजार खरेदी साठी तसेच अनेक कामासाठी वरोरा मध्ये येतात .एरवी एखादी तुरळक घटना वगळता असे कोणतेही मोठे अपघात घडताना दिसले नाही मात्र आज शुक्रवार ला एकाच दिवशी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर प्रकारच्या अपघाताची मालिका पहावयास मिळाली .
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी यांनी आता पर्यंत नऊ जखमींवर उपचार तर काहींना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याने आजच्या दिवसाने अपघातचा उच्चांक गाठला असे सांगितले .
आताच नव्याने माढेळी -वरोरा या मार्गावर वनोजा येथील रहिवासी असलेला 25 वर्षीय तरुण धिरज गमे काही कामानिमित्त वरोरा येथे येत असताना एका अज्ञात व्यक्ती ने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने सूरज गमे याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.धडक दिलेला तो अज्ञात व्यक्ती मद्य प्राशन करून असल्याचे माहिती मिळाली . प्राथमिक उपचार करून सूरज गमे ला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
