वर्ध्यात भाजपच्या जिल्हाध्यक्ष शिरीष गोडेचा काँग्रेस पक्षात प्रवेश

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वर्ध्यातील करंजी भोगे येथे आज 15 नोव्हेंबर ला सकाळी काँग्रेस पक्षात भाजपच्या जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी प्रवेश केला. भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, माजी मंत्री रणजित कांबळे, चारुलता टोकस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. डॉ. शिरीष गोडे हे शेतकरी असून भाजप पक्षाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहत नसून त्यामुळे गोडे नाराजी व्यक्त करत होते. एक महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गोडे यांनी राजीनामा पाठविला होता. त्यानंतर भाजप पक्षात खळबळ उडाली होती.

त्यांचा राजीनामा मंजूर केला गेला नाही. देश्यात इंधनदरवाढ, महागाई वाढत असताना शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले गेले असल्याने गोडे बोलत असे, मात्र त्यांचे वरिष्ठ दखल घेत नसल्याने ते पक्षात नाराजी व्यक्त करत होते. काही दिवसापूर्वी नितीन गडकरी यांनी गोडेची मनधरणी केली होती. मात्र आज काँग्रेस जनजागरण अभियान कार्यक्रम सुरू असताना डॉ. शिरीष गोडे यांनी पक्षात प्रवेश केल्याने मोठा धक्का बसला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणूक समोर असताना हा प्रवेश झाल्याने भाजपला बुचकळ्यात टाकले आहे.

सकाळीच भाजपला ठोकला रामराम भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी आज सकाळीचभाजप पक्षाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला. एवढ्या सकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजप पक्षावर किती नाराज आहे हे याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. ज्या पक्षात आपण एवढ्या दिवस काम केले. तो पक्ष सर्वसामान्य साठी नसल्याने त्या पक्षात आपला जीव गुदमरत असल्याने डॉ. शिरीष गोडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावला गेल्या.माझा आजही पक्षाने राजीनामा मंजूर करावा एक महिन्यांपूर्वी पत्रकार सोबत झालेल्या बैठकीत शिरीष गोडे यांनी सांगितले होते की भाजप पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणार पक्ष नाही. भाजप पक्ष गोरगरिबांच्या हितचा नाही. देश्यात महागाई एवढी वाढत असताना पक्ष काहीच करत नाही अश्या शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी माझा लवकरात लवकर राजनीमा मंजूर करावा असा बोलले होते.