
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर
कारंजा( घा):-गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आई ही सगळ्यांचीच सर्वप्रथम गुरु. तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आईरुपी गुरु आपल्याला देते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी च आज ‘गुरुपौर्णिमा’ ही मोठ्या उत्साहात सनशाईन स्कूल द्वारे भाकरे महाराज सभागृहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारंजातील प्रतिष्ठित व्यापारी श्री राम प्रांजळे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रेम महिले, तसेच जेष्ठ शिक्षिका संगीता चाफले उपस्थित होत्या, आजच्या या गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी, नृत्य , नाटिका सादर केली, तर आपल्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी छान अशी शुभेच्छा पत्र तैयार केली ज्यांची प्रदर्शनी लावण्यात आली होती, आजच्या या कार्यक्रमाचा सर्वात विलोभनीय प्रसंग म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पाय धुवून , चंदन टीका लावून केलेला सन्मान. उपस्थित मान्यवरांनी गुरुपौर्णिमेच महत्व सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यार्थी गुरू व गुरुमाऊली च्या वेशभुषेत सहभागी झाले होते आजच्या या कार्यक्रमाचे संचालन सौ घागरे यांनी केले , तर प्रास्ताविक शालीनी गोरे यांनी केले, तर लोहरकर मॅडम यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली, यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
