वडकी येथे “मद्यपाश एक घातक आजार “या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा व वर्धापन सोहळा संपन्न_

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

      

अल्कोहोलिक ॲनॉनिमस या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या “कृती समूह ,वडकी” च्या नियमित सभा जि.प प्राथमिक शाळा वडकी येथे दर बुधवार व शनिवारला सायं.७ ते ८ या वेळात होत असून ही संगत स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झाले आहे .या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवारला सकाळी 11 ते 5 या वेळेत ” मद्यपाश एक आजार” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा व वर्धापन सोहळ्याचे आयोजन स्व.डॉ.भानूदाजी कोकाटे मंगल कार्यालय,वडकी येथे करण्यात आले होते .
या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नदीप सिडाम व पोलीस उपनिरीक्षक भोंगाडे साहेब यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
“कृती समूह, वडकी” च्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस् सदस्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता मुंबई ,ठाणे ,नागपूर ,जळगाव , वाशिम, सावनेर ,चंद्रपूर, चांदुर रेल्वे, वरोरा, वणी ,शेगाव, चंदनखेडा, खांबाडा ,भद्रावती, कोरपना ,पांढरकवडा, मारेगाव येथील अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस् च्या सभासदांची हजेरी होती .
अल्कोहॉलिक्स ॲनॉनिमस् ही पुरुष व स्त्रियांची संघटना आहे. यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात कि ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते. अश्या प्रकारे सभासद आपले स्वतःचे तसेच एक दुसऱ्याचे प्रश्न सोडवतात . आणि दारूपासून दूर राहतात . संघटनेत सामील होण्यास कुठलीही वर्गणी आकारली जात नाही . फक्त त्या सभासदाची दारूपासून दूर राहण्याची इच्छा असली पाहिजे.
अश्या या संगती चा भाग असलेल्या “कृती समूह ,वडकी” ला सुरू होऊन दोन वर्ष पुर्ण झाल्यामुळे ‘मद्यपाश एक घातक’ आजार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा व वर्धापन सोहळा पार पडला .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सभासदांचे योगदान लाभले.