
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ शहरातील टिळकवाडी परिसरातील मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका डॉ. ने औषधीच्या नावावर रुग्णांची लूट सुरू केली आहे। या डॉ,. ने लिहिलेले पीसीडी औषध शहरातील इतर मेडिकल मध्ये मिळत नाही. त्यामुळे शहरात चक्कर मारून रुग्णांना शेवटी याच डॉ. च्या मेडिकल मध्ये येऊन औषधी विकत घ्यावी लागते.अशी मनमानी या डॉ. ची सुरू असून प्रशासनातील अधिकारी मात्र उघड्या डोळ्याने हा सर्व प्रकार पाहत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले.
महागाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात शिक्षण घेतल्या नंतर अमरावती येथे एमबीबीएस चे शिक्षण घेतलेल्या डॉ. ने स्वतः चे वेगळे वैभव निर्माण करून यवतमाळ शहरातील आर्णी रोड वर आपले रुग्णालय सुरू केले। या महोदयांने स्वतः ला मधुमेह तज्ञ असल्याचं भासवून रुग्णांच्या डोळ्यात धूळ फेकली। त्याच्या गोड वाणीला रुग्ण ही बळी पडले. अवघ्या काही वर्षातच या डॉ. ने रुग्णांची दिशाभूल करून स्वतः च वैभव निर्माण केले.सुरुवातीला या डॉ. ने दवाखान्याच्या दर्शनी भागात एमबीबीसी , एमडी ( मेडिसिन ) अशी डिग्री असल्याचे लिहिले होते. त्या नंतर काही दिवसातच एमबीबीसी , एमडी , डी डायबेटोलॉजी अशी स्वतः ची डिग्री लिहिली. याच एमडी आणि डायबेटोलॉजी पदविकेच्या च्या भरवशावर रुग्ण त्याला मधुमेह तज्ञ समजून त्याच्या कडे उपचारासाठी जात आहे. मात्र या डॉ ने रुग्णांचा अक्षरशः घात केला. अनेक रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये वेगवेगळी पदवी दाखविण्यात आली.
कालांतराने या डॉ.ने नवीन जागेत आपले रुग्णालय सुरु केल्या पासून तर पीसीडी औषध लिहिण्याचा सपाटाच लावला. पीसीडी औषध हे कंपनी कडून थेट डॉ. ला अतिशय कमी दरात येतात। ऍसिडिटी च्या 10 गोळ्याची स्ट्रीप 10 रु ला येते तीच स्ट्रीप डॉ. च्या मेडिकल मधून 90 रु ला विक्री केल्या जात आहे. तर मधूमेहच्या रुग्णांनासाठी नव्याने आलेली औषधी डापाग्लिफ्लोझिन ही 10 गोळ्याची स्ट्रीप 40 ते 42 रु मध्ये कंपनी कडून येते मात्र याच गोळीची स्ट्रीप 140 रु ला विकून रुग्णांची लूट केल्या जात आहे. विशेष म्हणजे हा गोड बोलू डॉ. रुग्णांना जी औषधी लिहून देतो। ती त्याच्याच रुग्णालयाच्या खाली असलेल्या मेडिकल मध्ये मिळते। कंपनी ने ही औषधी इतर मेडिकल ला देऊ नये यासाठी तो कंपनी वर ही दबाव टाकतो.एकंदरीत रुग्ण ज्या डॉ.ला देवदूत समजून उपचार घेत होते. त्याच डॉ. कडून हदबल रुग्णांना पीसीडी औषधी लादल्या जात असल्याचे दिसून येते.
