राळेगाव खरेदी विक्री संघात संविधान दिवस साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथील खरेदी विक्री संघात आज दिनांक २६ नोव्हेंबर रोज शुक्रवारला संविधान दिवस साजरा करण्यात आला .त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान मिलिंदभाऊ इंगोले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्या कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक तथा रावेरीचे सरपंच श्री राजेंद्रभाऊ तेलंगे,खरेदी विक्री संघाचे संचालक श्री अंकुशभाऊ मुनेश्वर,श्री भैय्यासाहेब बहाळे,श्री मारोतराव पाल,श्री श्रावनसिंगजी वडते,श्री प्रविणजी झोटींग,श्री अशोकराव काचोळे,श्री सचिनजी टोंग,श्री पंकजजी गावंडे,श्री अनिलजी देशमुख,ग्राम विविध कार्यकारी संस्था राळेगावचे संचालक श्री गजाननराव पाल ,पिंपळगावचे सरपंच श्री किशोरभाऊ धामंदे व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.