
राळेगाव तालुक्यातील वडकी शेतशिवारातील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी येथील शेतकरी राजेंद्र पुरुषोत्तमराव इंगोले गट नंबर 32 शेती 5 एकर या शेतकयानी आपल्या शेतात पाच एकर मध्ये चना व तुरी पेरल्या होत्या पण अचानक बेंबळाचे पाणी येवून शेतात शिरले व पाचही एकर
मध्ये असलेला चना व तुरी जलमय झाला. शेतात इतके पाणी शिरले की शेतात जाने सुद्धा कठीण झाले असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. बेंबळा प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या आठवड्यातील ही शेतात पाणी शिरल्याची दुसरी घटना आहे.मागील आठवड्यात सुद्धा यांच्या शेतात पाणी शिरले होते.दरवर्षी एक ना अनेक शेतकयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.आज राजेंद्र पुरुषोत्तमराव इंगोले यांचा चना व तुरी संपूर्ण जमीन दोष झाला आहे. शेतातील संबंधित अधिकारी यांनी येवून मोक्का पाहणी करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी राजेंद्र पुरुषोत्तमराव इंगोले रा.वडकी यानी आज दि 25 नोव्हेंबर रोजी प्रशासनाकडे केली आहे.
