माजी आमदार राजू तोडसाम यांच्या वाहनाला अपघात सिंगलदिप फाट्याजवळ ओव्हरटेकच्या नादात घडला अपघात

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

केळापूर मतदार संघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. हि घटना २७ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेचार वाजता दरम्यान घडली.

केळापूर मतदार संघाचे माजी आमदार राजू तोडसाम व सहकारी सुरज जाधव हे आपल्या हे खाजगी वाहन क्रमांक एम. एच. २९ ए. टी. ७५० ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातनी नागपूर वरुन पांढरकवडा कडे जात असताना वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंगलदीप फाट्याजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करीत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या अपघातात माजी आमदार राजू तोडसाम व त्यांचे सहकारी सुरज जाधव यांना किरकोळ दुखापत झाली असून अपघात ग्रस्त वाहनाचे मोठं नुकसान झाले असल्याचे सांगितले गेले. विशेष म्हणजे सदर वाहन माजी आमदार राजू तोडसाम हे स्वता चालवित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.