पुसद तालुक्यात दोन गटात हाणामारी एकाचा जागीच मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

पुसद विधानसभा मतदार संघा मधील काळी दौ. येथे दिनांक 3 डिसेंबर रोजी शुल्लक कारणांमधून दोन जातीच्या युवकांमध्ये वादावादी झाली. वादावादी झाल्यानंतर एका गटाने चाकू तलवारी काडीत हमला केला. यामध्ये श्याम शेषराव राठोड याचे वर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण उर्फ काऊ शेषराव राठोड वय अंदाजे 24 वर्ष हा सुद्धा जखमी असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. रुग्णालयामध्ये श्याम राठोड याचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकताच मृतकाचे नातेवाईक लोकांनी एकच हलकल्लोळ केला. तुटपुंजा पोलीस बंदोबस्ताने सर्वतोपरीने दंगा काबूत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तुटपुंजे पोलीस बळाला बघ्याची भूमिका घेण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. काळी दौ.येथे तणावग्रस्त परिस्थिती आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोकांनी बसस्टँड चौकामध्ये जाळपोळ केल्याची घटना सुद्धा घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे. पोलिस कुमक बोलावण्यात आलेली आहे.बातमी लिहे पर्यंत कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील हे स्वतः जातीने उपस्थित राहून परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत होते…