
मांगरूळ येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ येथून वणी कडे जात असताना मांगरूळ जवळील दिशादर्शक फलकाला दुचाकी क्रमांक MH29, AH9275 या शाईन दुचाकीने जोरदार धडक बसून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.1एप्रिल रोज शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. यवतमाळ येथील तरूण सय्यद इप्तेकार सय्यद अकील ( 27 वर्षे रा. यवतमाळ) यवतमाळ वणी मार्गावरून जात असताना वेगाव फाट्या नजिक दिशादर्शक फलकास जोरदार धडक दिल्यामुळे दिशादर्शक फलक कोसळून पडला.
त्या जोरदार धडकेमुळे तरुणाच्या डोक्याला जबरदस्त मार बसून गंभीर जखम झाली. जखमेतून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुध्द अवस्थेतच त्याला मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे पाठविण्याची तयारी सुरू होती. याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
