
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
झरी तालुक्यातील मुकूटबन येथून ६ किमी अंतरावरील गणेशपुर ते कोसारा मार्गावर दूचाकी घेऊन पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ३ डिसेंबर रोजी सायंकाळ दरम्यान मुकूटबन येथील सिमेंट फॅक्टरीत काम करणारा दिगंबर ऊमरे रा. वेगाव हा आपल्या झुपीटर दूचाकीने ड्युटी संपवून आपल्या गावी वेगाने जात असताना गणेशपूर ते कोसारा मार्गावर दूचाकी घेऊन पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला असून. त्याच्या तोंडाला मार लागल्याने रक्तस्त्राव झाला व बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळताच पाहणार्यांची गर्दी झाली. परंतु जखमीला कोणीही उचलून रुग्णालयात नेण्यास तयार नव्हते. त्यातच कोसारा गावातील शिक्षक प्रदीप गोडे यांना माहिती मिळताच त्यांनी जखमीला त्वरित उचलून वणी रुग्णालयात दाखल केले. व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. जखमींचे नातेवाईक वणी रुग्णालयात हजर झाले. जखमीच्या तोंडाला मार लागल्याने जखमी बेशुद्ध अवस्थेत होता. डाॅक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षक प्रदीप गोडे यांनी सांगितले.
