
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीत संपूर्ण छाननी नंतर चौदा प्रभागा साठी नव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
ओ.बी.सी.आरक्षणा चे तीन प्रभागातील निवडणूका एका आदेशान्वये स्थगित करण्यात आल्याने येथील उमेदवार काही से नाराज तर काही ना खूप बेचैन झाले असल्याचे चित्र काल दिसले.
काँग्रेस,भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस ने जवळपास एखाद दोन प्रभाग वगळता उमेदवारांची यादी ए.बी.फाॅर्म सह जाहीर केली आहे. उमेदवारांची सक्षम नावं पाहुन आजच्या घडीला काँग्रेस पक्ष आघाडीवर दिसत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या यादीत चार ते पाच चेहेरे वगळता इतर उमेदवार नवखे आहे.
नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख १३ डिसेंबर असून,पक्षश्रेष्ठी चा आदेश कोण कोण जूमानतो?कोण बंडखोरी करतो?यावर च पुढील समीकरणे राहील.अंतर्गत बंडाळी चा मोठा फटका या वेळी भाजपाला हमखास पणे बसेल असेच संकेत सध्या चर्चेअंती निदर्शनास येत आहे.
एक पूर्ण टर्म भाजपा ची आमदार की सह शंभर दिवस कॅबिनेट मंत्री आणि आता अडीच वर्ष विरोधी आमदार असून ही,नगर पंचायत राळेगांव च्या निवडणुकीत पूर्ण दमाचे सक्षम उमेदवार मिळू नये?काँग्रेस सह इतर राजकीय पक्षांच्या बंडखोरांची प्रतिक्षा करत वेळ काढू धोरण?ही शोकांतिका चं नाही का?
या उलट शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या च उमेदवारांना प्राधान्य देत अर्धी लढाई जिंकल्या गत आहे हे विशेष. तीन प्रभागाची निवडणूक स्थगित झाली तरी येथील उमेदवारांची अनधिकृत नावं जाहिर झाली च असल्याने आता आपलं कसं?याच विवंचनेत या तीन प्रभागातील उमेदवार आहे हे विशेष…
