लोकहीत महाराष्ट्र उत्कृष्ठ पत्रकार म्हणून रामभाऊ भोयर यांचा सत्कार,निर्भीड कामगिरी चा सन्मान

माध्यमांचं काम माहिती देणं, प्रशिक्षण, शिक्षण करणं, मनोरंजन करणं, प्रबोधन करणं असतं असं सांगितलं जातं. लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज आहे. पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो, असंही सांगितलं जातं. माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे, माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा म्हणून स्वीकारावं, असंही सांगितलं जातं.
पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं ‘मूकनायक’ ठेवलं होतं. पत्रकारांनी लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना डोळस करावं. पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा तटस्थपणानं करावी. त्यामुळे पत्रकार समाजातील काही घटकांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात. पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज विकसित होऊ शकत नाही. माध्यमाने निरपेक्ष, पूर्वग्रहदुषितपणे विषय मांडू नयेत, अशीही अपेक्षा असते. त्यातून पत्रकार खरच आपलं कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजुने उभी राहील, असे नाही. अनेक घटकांना सुखावताना काही घटकांची नाराजीही पत्रकारांना ओढवून घ्यावी लागते.

पत्रकार हा समाजाचा चेहरा म्हणून काम करताना सर्व सामान्य
नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व
निस्वार्थ प्रयत्न करणारा समाजतील एक भाग म्हणून काम करत असतो .कित्येक दा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधी ना सामोरे जावे लागते यात कधी कधी त्यांच्या जिवाला देखील धोका स्वीकारून काम करावे लागते अश्यातच उत्कृष्ठ कामगिरी गाजवणाऱ्या पत्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी लोकहीत महाराष्ट्र उत्कृष्ठ प्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित केले आहे.आज राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे रामभाऊ भोयर यांच्या राहत्या घरी संपादक अनिस रजा तंवर व सहसंपादक प्रशांत विजय बदकी यांनी त्यांचा लोकहीत महाराष्ट्र उत्कृष्ठ प्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित केले.सन्मान चिन्ह व चॅनेल चा माईक देतेवेळी
विलासराव साखरकर,दशरथराव कामडी ,यश भोयर यांची उपस्थिती होती.