
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबीत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ यांनी केलेल्या आंदोलनामध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास पाठिंबा दिला.
शिक्षकेत्तर महासंघाच्या शासनाकडे असलेल्या विविध मागण्या मध्ये प्रामुख्याने सुधारित आश्वाशीत प्रगती योजना लागू करणे व अन्यायकारक शासन निर्णय दिनांक ७/१२/२०१८ व शासन निर्णय १६/२/२०१९ रद्द करणे, सातव्या वेतन आयोगातील लाभाची (१०,२०,३०,)सुधारीत सेवांतर्गत आश्वाशीत प्रगती योजना लागू करणे,महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, महाविद्यालयातील रिक्त असलेले शिक्षकेत्तर पदे तात्काळ भरण्यास मान्यता देणे व १नोव्हेंबर२००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या आहेत.
या वरील मागण्यासाठी महाविद्यल्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री दीपक पेंदे,श्री योगेश इंगोले, श्री निखिल खापणे, श्री दत्तात्रय इंगोले, श्री राजू नगराळे, श्री हेमंत गिरी, श्री अनूप रोहनकर, श्री महेंद्र चहादे काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले.
