तंटामुक्ती समिती केवळ कागदावरच,ग्रामीण भागात अवैध धंदे वाढल्याने ; नागरिकांतून नाराजी.

  • Post author:
  • Post category:इतर

14 वर्षाचा तप होऊनही काही सुधारणा दिसत नाही

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू होऊन एक तपाचा कालावधी लोटत आला आहे. या कालावधीत गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी गावागावांमध्ये तंटामुक्ती गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
राज्यात सध्या या समित्या केवळ फक्त कागदावरच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यात 15 ऑगस्ट 2007 मध्ये तत्कालीन दिगवंत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावात तंटे निर्माण होऊ नयेत. व निर्माण झालेले तंटे गावातच मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरू केले होते.व गावात शांतता निर्माण करून जातीय व सामाजिक तेढ कमी व्हावे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा. या हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले व या अभियानाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आले होते.या अभियानाअंतर्गत गावागावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करण्यात आली.परंतु आता या योजनेला सुरू होऊन 14 वर्षाचा कालावधी लोटला असून गावागावात तंटामुक्ती गाव समिती स्थापन झाल्या असल्या तरी गावागावांमध्ये प्रत्यक्षात आजही अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे.

               

अनेक गावांमध्ये दारू विक्री होत असल्याचे वास्तव कोणालाही नाकारता येत नाही. अवैध धंद्यांमुळे तंटे वाढतात मग तंटामुक्त गाव कसे होणार ? असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना उपस्थित होत आहे.गावागावात तंटामुक्ती गाव समितीची स्थापना झाली असली तरी अनेक गावात तंटे कायम असून याकडे संबंधिताची दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु काही गावात तंटामुक्ती अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची निवड होताना निवडीवेळी शासनाने दिलेले नियम व निष्कर्षाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. तंटामुक्त गाव समिती मध्ये राजकीय पुनर्वसन केले जात असल्याने योग्य सदस्यांची निवड होत नाही. परिणामी या समितीच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे.तंटामुक्ती गाव समिती पदाधिकारी व सदस्यांच्या निवडीकरिता निकष देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावातील तंटामुक्त गाव समिती केवळ नावालाच असल्याचे दिसून येते.

       

———चौकट ——-

——- तंटामुक्त गाव समितीचे दुर्लक्ष ——

प्रत्येक गावात तंटामुक्त गाव समिती असून तंटामुक्त गाव समितीकडून गावातील तंटे गावातच सोडवण्याकडे व अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनात येते.

—- सकारात्मक भूमिका गरजेची —–

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी समित्याच्या पदाधिकारी यांच्यासह पोलिसांनाही सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे, तरच शासनाने सुरु केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान यशस्वी होईल. यामुळे छोट्या छोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात येणार नाहीत..