
6
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
दिग्रस शहराच्या कल्याण व सर्वांगिण विकासासाठी व सामाजिक विषयासाठी झटणाऱ्या दिग्रस तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे दि.२ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह येथे सर्वानुमते गठन करण्यात आले.यामध्ये कार्याध्यक्षपदी किशोर कांबळे,अध्यक्ष सुनील हिरास तर सचिव पी.पी.पप्पूवाले यांची निवड करण्यात आली.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार पुंडलीकराव इंगोले होते.आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू उद्धव अंबुरे व गोपाल शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी वर्ष २०२२ ची संपूर्ण कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली.कार्यकारी अध्यक्ष किशोर कांबळे,अध्यक्ष सुनील हिरास,उपाध्यक्ष प्रशांत झोळ,जय राठोड, सचिव पी.पी.पप्पूवाले, सहसचिव कपील इंगोले, प्रसिद्धी प्रमुख धर्मराज गायकवाड,कोषाध्यक्ष जुबैर खान, ग्रामीण प्रतिनिधी दीपक जाधव,संपर्क प्रमुख मुनीर खान उर्फ मुन्नाभाई तर उर्वरित २४ सभासदांमध्ये यशवंत सुर्वे-पाटील,मजहर अहमद खान, सुरेश चिरडे,फारूक अहेमद,अजीम खान,अब्दुल रफ़ीक़,अफझल खान, ऋषीकेश हिरास ,अजीज शेख,संदीप रत्नपारखी,शोएब सय्यद,अयाज काजी, आनंद आडे,हनुमान रामावत, काशिफ मिर्झा,राम राठोड,आकाश काशीकर,अनिल राठोड,आमीन कलरवाले,अविनाश इंगोले, जितेश बुरकुंडे,अनिल राठोड,शारिक शेख आदिंचा समावेश आहे.
सूत्रसंचालन मजहर अहेमद खान यांनी केले. प्रास्ताविक यशवंतराव सुर्वे-पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नवनियुक्त अध्यक्ष सुनील हिरास यांनी केले.यावेळी नवीन कार्यकारिणीमधील पदाधिकारी व सभासदांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
