
राजुरा: पुरोगामी साहित्य संसद राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. ४ जानेवारी २०२१ ला भिवकुंड नाला,बल्लारपूर रोड, विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देण्यात आली. गीरजाबाई भोंगळे,कमलाबाई बोरुले या वृध्द माता म्हणाल्या पोटच्या तीन मुली, मुले व 12 ऐकर घरी शेतीवाडी असूनही आम्हाला वृध्दाश्रम मध्ये राहावे लागत आहे.असे दुःख या मातेने व्यक्त केले. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर सर्वांना एकत्र करून पुरोगामी साहित्य संसद तर्फे वृध्द व्यक्तींना व मातेला ब्लँकेट, फळे वाटप करण्यात आले. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मातोश्री वृद्धाश्रम येथील वयोवृध्दाना सविता संजय भोयर अध्यक्ष, पुरोगामी साहित्य संसद राजुरा,उपाध्यक्ष विशाल शेंडे, कार्याध्यक्ष हेमा लांजेकर,संजीवनी धांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजीवनी धांडे,हेमा लांजेकर, सूरज पचारे, सविता भोयर, विशाल शेंडे, तुळसाबाई खडसे,आशाताई शृंगारे,ज्योति लबडे उपस्थित होते.
