मराठा सेवा संघ, राजुरातर्फे शिवजयंती व सत्कार समारंभ संपन्न

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा


छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण मानवी समाजाला समतेचे मूल्य देणारे युगनायक होते.- गंगाधर बनबरे
अर्धसैनिक दल, नीट, रासेयो, आचार्य पदवी, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार


दि. 20 फेब्रुवारी 2021 ला मराठा सेवा संघ, शाखा राजुरा द्वारा शिवजयंती व सत्कार समारंभ जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, राजुरा येथे कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून आयोजीत करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारपीठावर प्रसिद्ध इतिहास तज्ञ गंगाधर बनबरे, पुणे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विचारपीठावर जिल्हाध्यक्ष मसेसं दिपक खामनकर, चंद्रपूर, दिपक जेऊरकर तसेच तालुकाध्यक्ष मसेसं दिनेश पारखी, राजुरा, लक्ष्मण घुगुल, विजय मोरे, सारिका जाधव, स्वप्नील मोहूर्ले, संतोष रामगिरवार उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये दिलीप चौधरी, विनोद थेरे व सुधाकर खरवडे यांची विशेष उपस्थिती होती.
जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात अभ्यास करून CISF, BSF, CRPF या अर्धसैनिक दलात विशाल ढुमणे, CISF, शुभम खवसे, CISF, आदर्श उईके, CISF, अक्षय गावंडे, CISF, दिपक खेडेकर, BSF, अजय कन्नाके, CRPF तसेच यात एक मुलगी विद्या मोहितकर हिची CRPF साठी निवड झाली. कीर्ती घंटावार आणि मोनिका आगलावे या मुलींनी नीट परीक्षेत यश संपादन करीत BAMS या अभ्याक्रमाला प्रवेश मिळविला. विशाल शेंडे याला राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला. किशोर कवठे यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी मिळविली. रामरतन चापले यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सत्र 2019-20 ला मिळाला. दत्तात्रय मोरे, मधुकर बोबडे, बाबुराव पहानपटे हे शिक्षक सेवानिवृत्त झाले. वरील सर्व मान्यवरांचा मराठा सेवा संघ, शाखा राजुरातर्फे प्रमुख मार्गदर्शक गंगाधर बनबरे यांच्या हस्ते शाल, पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
महापुरुषांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढले पाहिजे. 2021 मधील नवे प्रश्न सोडवायचे असतील तर शिवचरित्र अभ्यासावे लागेल. महाराज पुराणपुरुष नव्हते तर इतिहासपुरुष म्हणून महाराजांनी या देशात कर्तबगारी गाजवली आहे. आज ज्ञानाचं नव युग तयार झालेलं आहे. त्या युगाकडे वाटचाल करणारा नव-समाज निर्माण करणे ही खरी शिवाजी महाराजांना आदरांजली असणार आहे असे प्रतिपादन गंगाधर बनबरे यांनी आपल्या व्याख्यानात केले.
कार्यक्रमाचे संचालन मधुकर डांगे यांनी, जिजाऊ वंदना दिनेश पारखी व संभाजी साळवे यांनी संयुक्त गायिली तर आभार प्रदर्शन संभाजी साळवे यांनी केले.
शिवजन्मोत्सव व सत्कार समारोह यशस्वी करण्यासाठी मधुकर मटाले, लक्ष्मण तुराणकर, दिलीप गिरसावळे, चंद्रकांत भोयर, राजू भोयर, विनोद बोबडे, देविका येमुलवार, सुरज भामरे, प्रतीक कावळे, वैभव अडवे, दिनेश उरकुडे, अनिकेत साळवे यांनी परिश्रम घेतले.
Dinesh P. Parkhi,OBC, MSS मो. 9423401841