अपघात:अनियंत्रित ट्रॅव्हल्सची ट्रक ला धडक,प्रवासी गंभीर जखमी,2 प्रवासी मृत

वरोरा शहराच्या रत्नमाला चौकाजवळ असलेल्या लगान बार च्या जवळ ट्रव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुख्य रस्त्यावरील डिवायडर चा लोखंडी पोल तोडून दुसऱ्या बाजूच्या रोडने जात असलेल्या एका ट्रक ला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रव्हल्स मधील काही प्रवाशी मृत पावल्याची माहिती असून अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
गजबज असलेला रत्नमाला चौकात झालेल्या अपघातात ट्रव्हल्स चा ड्रायव्हर मोबाईल फोन चा वापर करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे च गाडीचे नियंत्रण सुटले व अपघात घडला अशी प्राथमिक माहिती आहे.