ग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.एल.सिरसाट यांचा स्मृतिदिन निमित्ताने शेतकऱ्यांना बियाणे वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

स्व.पी.एल‌.सिरसाट प्रणित ग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.एल.सिरसाट यांचा स्मृतिदिन ग्रामीण पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही दारव्हा तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांचे वतीने स्व.पी.एल.सिरसाट यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.यावेळी वेगवेगळ्या उपक्रमाची परंपरा कायम राखत दारव्हा तालुका ग्रामीण पत्रकार संघाने शेतकरी बांधवांना तिळ या बियाण्याचे वाटप केले.यावेळी महागांव कसबा येथील दहा शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले.
स्मृतिदिन कार्यक्रमाचे सुरुवातीला स्व.पी.एल.सिरसाट यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर शेतकरी बांधवांना तिळ बियाणे वाटप करण्यात आले.यावेळी दिपक लाड,शरद मुंडवाईक गणेश राठोड, मुस्ताक निर्बान, हरीभाऊ परांडे, दिनेश ताजने, ज्ञानेश्वर आरेकर, नारायण लोखंडे, विष्णू कांबळे, सुभाष जयस्वाल आदी शेतकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दारव्हा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले होते.संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा महागांव कसबा ग्रामपंचायत सरपंच किशोर बिहाडे, संघटनेचे सल्लागार व माजी अध्यक्ष दिपक वगारे,एन टि.व्ही.न्युज चे जिल्हा प्रतिनिधी अमित पुसदकर, पत्रकार आरीफ मलनस,विजय बिहाडे या सर्वांच्या अथक परिश्रमाने स्मृतिदिन साजरा करण्यात आला.