
.
शिवसेना वणी शहर व नगर सेवा समितीचे वतीने बाळासाहेब ठाकरे स्मारक ठिकाणी अभिवादन.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने नगर सेवा समिती व शिवसेना वनी शहराच्या वतीने वनी शहरातील रस्त्याच्या कडेला थंडी मध्ये कुडकुडत झोपून असलेल्या गरजवंत लोकांना त्याच्या अंगावरती ब्लॅंकेट टाकून मायेची ऊब देण्यात आली सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर,नगर सेवा समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवडे, दीपक कोकास माजी उपजिल्हाप्रमुख ,राजू तुरानकर शहर प्रमुख, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे, भारतीय कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अवि भुजबलराव, सुशील मुथा, युवासेना माजी शहर प्रमुख ललित लांजेवार, प्रवीण खानझोडे, मनीष बतरा, शाखा प्रमुख जनार्दन थेटे, भगवान मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकास अभिवादन करण्यात आले, त्यानंतर साईबाबा चौक परिसर, बस स्टँड परिसर व टिळक चौक यामध्ये रस्त्याच्या कडेला थंडीमध्ये कुडकुडत झोपून असलेल्या लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी नगर सेवा समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवडे, दिनकर ढवस ,विकास जयपुरकर,बबन केळकर, उपस्थित होते.
