
वणी : नितेश ताजणे
तालुक्यातील मानकी येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ माणकी तथा समस्त ग्रामवासीयांच्या वतिने ‘वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमीत्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी दि.३० जानेवारी ला पहाटे ५ वाजता तुकडोजी महाराज चौकातील पुतळ्याजवळ पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांचे हस्ते घटस्थापना करण्यांत आली. गावकऱ्यांनी गावासाठी एकत्रीत येऊन गाव विकास साधावा असा मोलाचा उपदेश त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला.
यावेळी सरपंच कैलास पिपराडे, ग्रा.पं.सदस्य नानाजी पारखी, सदस्या सौ.इंदीरा पोटे. नलु मिलमीले, शाळा व्य.समिती अध्यक्ष विजय काकडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे, पोलीस पाटील सौ. मिनाक्षी मिलमिले,माजी पो.पा.चरण पुरी,नानाजी नेहारे,विठ्ठल खुसपुरे, यांचेसह गावकरी, महीला मंडळ उपस्थित होते.
त्यानंतर ग्रामगीता वाचन, सामायिक ध्यान,सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना श्रीमती विद्याताई जुनगरी यांचे सामुदायिक प्रार्थनेवर मार्गदर्शन, सायंकाळी ७ वाजता राष्ट्रसंत विचार संमेलन व महीला मेळावा, सोमवार दि.३१ जानेवारी ला पहाटे ४ वाजता ग्रामसफाई, ५:३० वाजता सामुदायिक ध्यान,सकाळी ७ वाजता शोभायात्रा व मिरवणुक,१२ वाजता काल्याचे किर्तन, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेनंतर महाप्रसाद व राष्ट्रवंदनाने समारोप करण्यात आला.
