
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आम आदमी पार्टी यवतमाळ शहर व तालुका यांच्या वतीने राळेगाव तालुक्यामध्ये तहसीलदार डॉ कानडजे साहेब यांनी राळेगाव तालुक्यामधील चिखली व वणोजा हे दोन गावे सुचवली व त्यासाठी त्यांनी आम्हाला तेथील तलाठी सौ भोयर मॅडम यांना सोबत दिले त्यांच्या सूचनेनुसार या दोन गावांमधील जे अत्यंत गरजू लोक आहेत जसे वयस्कर लोक ज्यांची घर पुरामुळे नुकसान झाले काही गरीब शेतकरी महिला या सर्वांना आम आदमी पार्टीच्या वतीने एक धान्याची किट ज्यामध्ये पाच किलो कणिक तिखट मिठाचे पॅकेट तेलाचे पॅकेट बिस्किट पुडा माचिस खोडरबर पेन्सिल व मच्छर अगरबत्ती असे साहित्याचे किट बनवून जवळपास 60 लोकांना मदत करण्यात आली आम्हाला माहिती आहे ही मदत एकदम अल्प आहे पण चिमणीचा घासा प्रमाणे का होईना त्यांना आम्ही खाऊ द्यायचा प्रयत्न केला यासाठी आम आदमी पार्टीचे खालील पदाधिकारी जसे यवतमाळ तालुकाध्यक्ष अतुल झोपाटे जिल्हा कोषाध्यक्ष विलास वाडे युवा संघटक आकाश चमेडिया चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक भाऊ कॉम्पलवार तसेच रायगाव तालुक्याचे अध्यक्ष श्री आशिष भोयर पाटील तसेच श्री तागडे सर राळेगाव कोषाध्यक्ष व राळेगाव येथील इतर कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते या गावचे तलाठी सौ भोयर मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये गरजवंतांना जे अत्यंत गरीब व वयस्कर मजूर वर्ग यांनाही मदत करण्यात आली तिथे गेल्यावर अशा अनेक महिला मिळाल्या की ज्यांना राहायला घरे नाही त्यांच्या दोन्ही मुलांनी कर्जाला कंटाळून मुलांना शिकवू न शकल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत असे बरेच लोक मिळाले त्यांच्या अपेक्षा आम आदमी पार्टी कडुन बऱ्याच दिसत होत्या आजही घरकुल योजना किंवा सरकारच्या कुठल्याही योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या नाही याची दुःख आमच्या डोळ्यांमध्ये दिसत होते यासाठी आता आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून त्यांना पूर्ण मदत करील
