
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
मातोश्री त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२४ वी जयंती तक्षशिला बुद्ध विहार कळंब (माथा) येथे उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र बलवीर होते सदर कार्यक्रमां मध्ये सुगत नारायने, सुधाकर ठोंबरे ,वीरेंद्र पाटील, सचिन भगत , राजेंद्र बलवीर , रोमांत पाटील यानी त्यागमूर्ती मातोश्री रमाई यांच्या जीवनावर प्रबोधन पर विचार माढले कार्यक्रम मध्ये अर्चना बलवीर ,अर्चना पाटील ,प्रज्ञा भवरे , वृंदा राऊत , शेवंताबाई राऊत, अरुणा बलवीर , शेबु बाई चंदनखेडे , शोभा वाघमारे, रेखाबाई भगत , प्रमिलाताई गानार , विश्वजीत गाणार,प्रशिक भवरे ,अनुज बलवीर सुरज भगत, मोहित राऊत, चतुरपाय यांचेसह बहुसंख्येने उपासक व उपासिका हजर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रवि वानखेडे ,कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश भवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन भगत यांनी केले.
