
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी मा. तहसीलदार मार्फत मा. राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले त्यात असा विषय मांडला आहे की राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत अभाविप राळेगाव चा जाहीर निषेध आहे.
तहसिलदार सरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली
आंदोलनात उपस्थित अभाविप राळेगाव चे नगर मंत्री अंकित तीवाडे, नगर सहमंत्री हर्ष वानखडे, IGKM कार्यकारणी अध्यक्ष लक्ष्मण ढुमने, अभाविप सदस्य अर्जुन वर्मा, लचित धनरे
व सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी सहभाग होऊन चांगल्या पद्धतीने आंदोलन व निवेदन पार पडलं…
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा राळेगाव अशी मागणी करते की महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात शिक्षणाची गुणवत्ता ढासळणाऱ्या बदलांचा कायद्यात रूपांतर करू नये
