
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज ग्राम स्वराज्य महामंच च्या सहविचार सभा बैठकीचे आयोजन राळेगाव येथे घेण्यात आले होते प्रमुख पदाधिकारी मा.प्रा.मोहणजी वडतकर – वर्धा मा.मधुसुदन कोवे गुरुजी मा.गिरीधरजी ससनकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
वसुंधरा स्वच्छता अभियान राबविण्यासाठी “माझं शहर सुंदर शहर” या सामाजिक उपक्रमात मा.युसुफभाई सय्यद यांच्या स्वच्छता अभियान या सामाजिक कार्याची दखल घेवून राळेगाव शहरासाठी ब्रॅण्ड ॲंम्बेसिटर म्हणून निवड केली आहे म्हणून सहविचार सभेत त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेतला आहे
वसुंधरा स्वच्छता अभियान राबविण्यासाठी राळेगाव शहरासाठी लवकरच ” सुंदरा वसुंधरा ” या अभियानाची सुरुवात करण्या साठी नियोजन करण्यात आले आणि लवकरच हा उपक्रम राबविण्यासाठी युसूफ भाई सय्यद यांच्या सोबत सहभागी होत आहे
राळेगाव शहर स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी ब्रॅण्ड ॲंम्बेसिटर यांच्या उपस्थितीत योग्य समन्वय समिती गठीत करुन सामाजिक जबाबदारी ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे मतं मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी सहविचार सभेत मांडले आहे.
सहविचार सभेकरीता उपस्थित मा प्रा.मोहण वडतकर मा मधुसूदन कोवे गुरुजी मा गिरीधर ससनकर गुरुजी मा प्रल्हाद काळे नितीन ठाकरे सौ रेखा निमजे श्रीमती आशा काळे ग्राम स्वराज्य महामंच चे पदाधिकारी उपस्थित होते.
