राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक,दिन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोधा उपेक्षितांच्या जिवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वत‌.च्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती धानोरा येथे रमाई महिला कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वडकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक अशोकराव भेडाळे साहेब, धानोरा ग्रामपंचायत सरपंच्या दिक्षाताई प्रवीन मुन,रमाई महिला कमिटीच्या अध्यक्षा आशाताई नंदकिशोर भोंगाडे, सचिव विशाखाताई विजयराव वावरे, कोषाध्यक्ष बाळकृष्णाबाई नानाजी कांबळे, विजय वावरे,बडुजी लभाने, विजय लभाने, पुरुषोत्तम थुल,प्रविन मुन,चतुरदास कुळसंगे, अशोक मुन,मुनेश्वर कुळसगे, निर्मला थुल,उमा दिलीप थुल, उज्वाला गणेश जवादे, वनिता भारत थुल, उज्वला विलास भोगाडे,निलीमा शाहू जवादे,चंदा गजानन मुन, शोभा नारायण जवादे, सुनिता मिलींद भोगाडे, महानंदा पुंडलिक भोगाडे व अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.