
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
समुद्रपूर तालुक्यातील कांढळी सर्कल येथील काल दिनांक ११ फेब्रुवारी रोजी विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच आमदार समिर कुणावार यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितित आमदार कुणावार यांचे बैंडबाजा लावून स्वागत करण्यात आले.
समुद्रपुर तालुक्यातील वायगाव गोंड येथे १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत २.९० लक्ष निधितुन सिमेंट नाली बांधकाम करणे भूमिपूजन,
जिल्हा वार्षिक योजनेतून १४ लक्ष निधितुन उमरी येथे ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन,
१४ लक्ष निधीअंतर्गत कुर्ला येथे ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण तसेच एक वर्ग खोलीचे भूमिपूजन, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण सभापती मृणाल माटे यांच्या विशेष प्रयत्नातुन वर्ग खोलीचे भूमिपूजन तसेच १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत २.९० लक्ष रुपयाचे नालीचे भूमिपूजन करण्यात आले.
कळमना येथे पुलाचे लोकार्पण जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत १ कोटि,५ लक्ष तसेच विखणी येथील १४ लक्ष निधितुन उभारलेल्या ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण इत्यादि अनेक विकासकामे जनतेच्या सेवेत बहाल करण्यात आली.गावकऱ्यांनीसुद्धा आ.कुणावार यांचे आभार मानित ठिकठिकाणी ऊस्फूर्त स्वागत केले.
उपरोक्त कार्यक्रमाचेवेळी
आमदार समीर कुणावार यांचेसह पंचायत समिती सभापती सौ सुरेखा कैलास टिपले, उपसभापती योगेश फुसे ,पंचायत समिती सदस्य जयश्री दांडेकर, कानकाटी येथील सरपंच बळीराम राऊत, सरपंच रोशन पांगुळ ,सरपंच विकास भोयर, उपसरपंच गणेश चौधरी, सरपंच पवन पेंदाम, उपसरपंच गणपतराव आखुडे ,पांडुरंग पिचकाटे, सरपंच किशोर कुडमेते, प्रवीण साठोणे ,सरपंच चेतना बोरकर, प्रविण अंड्रस्कर ,बालू इंगोले, संदीप फुसे ,कैलास टिपले, शंकर धोटे ,नामदेव इंगोले, तुकाराम बारई इत्यादी मान्यवर उपस्थित होते,याप्रसंगी गावकरी मंडळी तसेच ग्रामपंचायत येथील सदस्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
