वंचित बहुजन आघाडीची समिक्षा बैठक

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

तालुक्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी राळेगावच्या वतीने दिं १३ फेब्रुवारी २०२२ ला समिक्षा सभेचे आयोजन कोरोनाचे सर्व नियम पाळुन शासकिय विश्रामगृहात करण्यात आले . या सभेमध्ये सत्तेपासुन वंचित असलेल्या घटकांना एकत्रीत करुन त्यांना सत्तेत पाठविण्याचा निर्धार करण्यात आला . फुले , शाहु , आंबेडकरी विचार घरोघरी पोहचविण्याचा व वंचित घटकांना उमेदवारी देऊन त्यांना राजकीय सत्तेत अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन महीला आघाडी यवतमाळचे महासचिव एकत्र आणण्याचा निर्धार करण्यात आला . सौ.करुनाताई मुन तर प्रमुख पाहुणेम्हणून पाठविण्यासाठी सर्व वंचित घटक पक्षांना जिल्हा महिला आघाडी यवतमाळपुर्वचे महासचिव सौ . सरलाताई चचाणे मॅडम , यवतमाळच्या शहर अध्यक्षा सौ . करुणाताई चौधरी मॅडम , गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महीला आघाडीचे जिल्हाअध्यक्षा सौ.विजयाताई रोहणकर मॅडम , राळेगांव गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुका अध्यक्ष मा . विठ्ठल धुर्वे , वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा . विकास मुन , उपाध्यक्ष मा . राहुल उमरे , तालुका महासचिव मा . प्रकाश कळमकर , सल्लागार प्रमुख मा . डॉ . ओमप्रकाश फुलमाळी , राळेगाव शहर अध्यक्ष मा . दीपक आटे , शहर उपाध्यक्ष मा.संतोष घनमोडे , शहर सचिव सुधाकर लोहवे उपस्थीत होते . या सभेला तालुक्याचे संघटक मा . भगवान तागडे , आकाश भगत , लोकेश दिवे , अजय दारुंडे , कपील फुलमाळी , मीलींद भरणे , सुरज वाघमारे , केशव वाघमारे , यवतमाळ येथील थुल सर , धम्मानंद तागडे सर , सिद्धार्थ भगत , इत्यादी मान्यवर उपस्थीत होते . या सभेमध्ये जिल्हापरिषद व पंचायत समीतीच्या सर्वच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला . सभेचे संचालन तालुक्याचे अध्यक्ष मा . विकास मुन यांनी केले तर आभारप्रदर्शन तालुका महासचिव मा.प्रकाश कळमकर यांनी केले .