शिवसेने तर्फे साडी चोळी व डबल बेड चा आहेर

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेना प्रमुख स्व. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला अनुसरून आणी रजनीताई मेश्राम उप तालुका संघटीका बोर्डा-शेगाव वरोरा यांच्या सामाजिक कार्याला मदत म्हणून कोलाम मोहल्ला रोड बोर्डा येथील गरीब घरातील नवरी मुलगी दुर्गा हिला एक छोटीसी मदत म्हणून मनिष भाऊ जेठानी जिल्हा सरचिटणीस वरोरा यांनी एक डबल् बेड दिवान भेट दिली. तसेच गणेश भाऊ जानवे युवासेना शहर प्रमुख वरोरा यांनी डबल बेड गादी भेट दिली. तसेच अल्का ताई पचारे उपशहर संघटिका वरोरा यांनी नवरी मुलीला साडी आणि आर्थीक मदत दिली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मा. मुकेश भाऊ जिवतोडे तसेच् शहर प्रमुख संदिप भाऊ मेश्राम , अतुल भाऊ नांदे शिवसैनिक्, अनिल भाऊ गाडगे शिवसैनिक यांची प्रमुख उपस्थितीत लाभली. वधू वर यांना पुढिल आयुष्यासाठी जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जिवतोडे आणि सर्व पदाधिकारी व महिलाआघाडी यांनी शुभेच्छा दिल्या .. मदत तिथे शिवसेना गरिबानं साठी धावून येणारी समाजकार्या साठी नेहमी अग्रेसर राहणारि असे बोध वाक्य जिल्हा प्रमुख मा. मुकेश भाऊ जिवतोडे यांनी म्हटले.
