सावरखेडा येथे कबड्डी सामन्यांचे उद्घाटन..!!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225)

राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे स्व.वामनराव बापू इंगोले ( सावरखेडा गावाचे शिल्पकार) यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिव छत्रपती क्रीडा मंडळ सावरखेडा यांचे वतीने शिवजयंती निमित्त भव्य कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामन्याचे उद् घाटन दि.१९-२-२०२२रोजी माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव ॲड प्रफुल्लभाऊ मानकर, संचालक विदर्भ मार्केटिंग फेडरेशन अरविंदभाऊ वाढोणकर, अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी अरविंदभाऊ फुटाणे ,माजी सभापती पं.स.राळेगाव प्रविणभाऊ कोकाटे ,प.स.सदस्य निलेशभाऊ रोठे,सरपंच सावरखेडा सौ.गिताताई रा.मेश्राम , उपसरपंच बंडूजी धुळे,रामचंद्र जी कन्नाके ,बाळासाहेब इंगोले,अंकुशभाऊ मुनेश्वर ,रविद्रभाऊ देशमुख,किशोरराव धामंदे,पुरुषोत्तमजी चिडे आदी मान्यवराचे उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडला . कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी पुंडलिकराव खंगारे,सौरभ तेलंगे ,पवन उरकुडे , अमोल राऊत,संदीप मेश्राम,चेतन दुर्गे,अनिल निंबादेवी,कुणाल घोडाम, सुधाकर मेश्राम,रुपेश शेळके,स्वप्निल तोडासे, प्रशांत परचाके,कुणाल महाजन,मनोज मेश्राम व गावकरी बंधू तसेच मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.