मुस्लिम मावळ्याकडुन अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

तालुका प्रतिनिधी: चंदन भगत, आर्णी(८६९८३७९४६०)


आर्णी तालुक्यातील तळणी हे गाव नेहमीच विविधतेत एकता साधणारे गाव म्हणून परिचित आहे. सर्व धर्माचे लोकं तळणी या गावात राहतात एकमेकांच्या उत्सवांमध्ये सहभागी होऊन ते उत्सव साजरे करणे ही या गावची परंपरा.यावर्षी त्याची प्रचिती आली.नुकताच झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुस्लिम मावळ्यांनी जाणता राजा ची जयंती साजरी केली.ती साजरी करताना अनोखा सहभाग नोंदवला म.न.वि.से. युवा तालुका उपप्रमुख असलम युनूस खाँन यांच्या संकल्पनेतून यंदा या युवा ब्रिगेडने शिवजयंतीच्या रॅलीचे भव्य स्वागत करत सर्व शिवप्रेमींना चहा नाश्ता व थंड पाण्याची व्यवस्था केली.हा आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात केला आणि पुन्हा एकदा एकात्मतेचे दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवले.या जयंती उत्सवात मुस्लिम शिव मावळे म्हणून भूमिका पाडणाऱ्या अनेक तरुणांना मधून सक्रिय कार्यकर्ते म्हणून श्री. सैय्यद कदिर,शरीफ खाँन ,इर्शाद खाँन अन्वर खाँन ,सैय्यद मुक्तार, सलमान खाँन, शेख रमजान, सादिक शहा ,तन्वीर खाँन, सैय्यद रमजान, शेख वकील, सैय्यद अनिस ,शेख मोसिन, सैय्यद साहिल,समीर खाँन,शेख जावेद, सलमान ई.खाँन,शेख जब्बू, या तरून मावळ्यांनी सहभाग घेतला.