भाजपा च्या वतीने मातृपितृदिनाचे आयोजन.. मातापित्याचे करण्यात आले पुजन

  • Post author:
  • Post category:वणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

           

शहरातील संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्र.५ येथे मातृपितृदिनानिमित्त मातृपितृ पूजनाचे आयोजन काल दि.२६ रोजी करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे,भाजपा शहरअध्यक्ष आशिष पर्बत,नगरसेविका सौ.रविला आखाडे,सौ.रश्मी पर्बत,नव्हातेताई इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी मातृपितृत्वाप्रती आदर व्यक्त करीत नृत्यस्पर्धा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विशेष म्हणजे यावेळी प्रभागातील मुलामुलींनी आपल्या आइवडिलांचे पूजनही केले.
उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन शहर भाजपाचे अध्यक्ष आशिष पर्बत यांचेवतीने करण्यात आले.
शहर भाजपाचेवतीने आयोजित उपरोक्त कार्यक्रमाची नागरिकांनी प्रशंसा करीत असा उपक्रम शहरात सर्वत्र राबविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी अमोल राऊत(भाजपा शहर महामंत्री),प्राध्यापक मनोजजी कोरेकर,आकाश घरोटे, प्रजोत हुलके, दिप्ती सुत्वणे,सोनाली राऊत, सारिका कामडी,प्रकाश वाघमारे, श्रीकांत अग्निहोत्री,राहुल वकुळकर,सर्वेश तांबेकर, कल्याणी राऊत,दिपली घरोटे,ममता कुरेकार, नीता रविकांत डोळसकर,स्नेहा पांडे,अदिती अग्निहोत्री, स्वपणील धोपटे,श्रीकांत नीमजे,नरेंद्र पोटदुखे,विनय पंचवटे,संजय पवार, आशिष बोबडे,गणेश भजबुजे,प्रसाद पांडे,किशोर खडसे,शरद वाघमारे,मोहन शेंडे, डाहळे सर,मयुर जिकर,अनिल उपासनी प्रमोद घरोटे,मंगेश सुतवणे
इत्यादिन्नी परिश्रम घेतले.