कवी प्रदिप पं कडू यांच्या वऱ्हाडी ठेचा काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

जय महाकाली शिक्षण संस्था, लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा,किरण बहुउद्देशिय सेवा संस्था व राजभाषा मराठी महोत्सव आयोजन समितीच्या वतीने तीन दिवसीय राजभाषा मराठी महोत्सव 2022 चे आयोजन अग्निहोत्री कॉलेज परिसर रामनगर वर्धा येथे करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमांचे उद्घाटक पंडीत शंकरप्रसाद अग्निहोत्री,अध्यक्ष डॉ. सतिश पावडे, सुप्रसिध्द कवी नितिन देशमुख,अनिल नरेडी, मुख्य वक्ता डॉ. मंजुषा सावरकर व कवि मोहन शिरसाट , डॉ. रत्ना नगरे , महोत्सव आयोजक संदीप चिचाटे, संजय ठाकरे,संजय इंगळे तिगावकर, डॉ. सुधीर अग्रवाल, शोभा भोयर, जीवन बांगडे, दिलिप रोकडे, आशिष पोहाणे, प्रा. किरण नगरे,पद्माकर बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी वऱ्हाडी कवी प्रदिप कडू यांच्या “व्हराडी ठेचा”, या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.. या वेळी नवोदित साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. कवी प्रदीप कडू यांनी विविध सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. सतीश पावडे यांनी वऱ्हाडी ठेचाकार प्रदीप कडू यांना भविष्यातील वाटचलीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांचे संचालन ज्योती भगत यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप चिचाटे, डॉ.रत्ना नगरे , अनिल
नरेडी ,संजय ठाकरे ,जीवन बांगडे, दिलीप रोकडे, आशिष पोहाणे, मीनल कसणारे, दामोदर राऊत ,गौरव ओमकार, प्रतीक सूर्यवंशी ,चंद्रकांत डगवार, डॉ.संदेश निंबाळकर, प्रा. किरण नगरे, नंदा बोंडसे, मंदा वांदिले यांनी प्रयत्न केले.