व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी युवकांनी तयार राहावे – रवीदादा मानव

वणी :- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने २७ जानेवारी ला किराणा दुकानात वाईन विक्रीचा परवाना देणारा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून साधुसंत महापुरुषांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला व्य संयुक्त महाराष्ट्र बनवण्याची तयारी आहे तेव्हा तरुणांनी वेळीच सावध होऊन या निर्णयाला विरोध करून “व्यसन युक्त नव्हे” तर व्यसनमुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यासाठी तयार असले पाहिजे असे प्रतिपादन रविदादा मानव यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवगड झमकोला येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये केले.
पुढे बोलताना ते म्हणाले देशातील तरुण पिडी एका विशिष्ट मार्गाने भरकटत चालली असून या तरुणांनी महामानवांच्या मानवतेचा लढा समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच आजचा तरुण उध्याचा देश घडवू शकतो असे .
संत महापुरुष्यांच्या विचारानेच मानवतेचे कल्याण आहे. तरुण पिडीने व्यसनापासून दूर राहून आपले जीवन निर्वेसनी करावे आणि स्वयंरोजगार निर्माण करत उधोग व्यवसाय उभारावे तरच बेरोजगारीवर मात येईल असेही उद्धबोधन रवीदादा मानव यांनी उपस्थित तरुणांना केले.
शिवगड झमकोला येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या प्रमाणात झाली हजारोंच्या संख्येत महादेव भक्तांनी यावेळी या यात्रेसाठी गर्दी केली होती.
यावेळी विचारपीठावर राष्ट्रीय कीर्तनकार विवेक महाराज कुरुमकर व त्यांचा संच उपस्थित होता. यावेळी विवेक महाराज कुरुमकर यांनी आपल्या सत्य शील आणि सम्यक वाणीतून खणजेरीच्या नादाने आपले राष्ट्रीय कीर्तन सादर करून उपस्थित जनसमुदायांना संत विचाराचे धडे गिरवत सर्वांचे मने जिंकली. यावेळी मोहनराव वैद्य, सप्तखंजेरी वादक चीडे गुरुजी, इत्यादी उपस्थित होती या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी देवस्थान कमिटी शिवगड झमकोला व राजूभाऊ उपरे, मित्रमंडळींनी परिश्रम केले
.