
मांगली येथील गुटखा तस्कर मुकूटबन पोलिसांच्या ताब्यात
३४ हजार ८५५ रुपयाचा गुटखा जप्त, आरोपीवर गुन्हे दाखल
तालुका प्रतिनिधी, झरी:– तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली येथील एका तरुणांच्या घरून मजा ,ईगल,विमल व हुक्का नामक गुटखा जप्त केले व आरोपीस अटक करून त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
झरी तालुक्यतील अनेक गावातील किराणा दुकान व पान मटेरियलच्या दुकानातून सुगंधीत गुटख्याची विक्री सुरू आहे. तर तालुक्यातील पानटपरी व किराणा दुकानदारांना मोठया प्रमाणात दुचाकी व चारचाकी मालवाहतूक गाडीने पाटण, झरी, मुकूटबन,खडकी ,गणेशपूर, कोसारा अर्धवन,,अडेगाव,खातेरा,तेजापूर ,आमलोन या गावातील किराणा दुकान व पानटपरीवर सुग्णांधित माजा, विमल, गुटखा तसेकंज विविध प्रकारची गुटखा पुडीचा पूरवठा सुरू आहे. झरी तालुक्यातील मांगली गाव हे गुटखा टास्करीचा हब झालेला आहे. मांगली गावातील काही गुटखा तस्करांना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व पार्डी गावातून पैनगंगा नदीच्या पात्रात खातेरा व परसोडा या नदीपात्रात मालवाहू गाडीने मोठ्या प्रमाणात मजा,ईगल व इतर कंपनीचा गुटखा पोहचविले जाते. तिथून मांगली येथील मोठे गुटखा तस्कर गुटखा घेऊन येतात व वरील गावात मोठ्या प्रमाणे सप्लाय करतात. कोरपना येथील मकसूद पार्डी येथील राम व रमेश,पांढरकवडा येथिल अलीम,वणीं येथील दीपक , विक्रांतव व पुरण तर नेरड येथून नितीन नामक लोकांकडून गुटखा तालुक्यातील दुकानदार व पानटपरी चालकांना पोहचविले कॅट आहे. या व्यतिरिक्त मुकूटबन अडेगाव तेजापूर आमलोन गणेशपूर खडकी व इतर गावातील पानटपरी चालक पहाटे ५ वाजेपासून दुचाकीने खातेरा नदी पात्रात जाऊन पार्डी येथील गुटखा तस्करकडून ५ ते ६ मजा डब्बे विकत घेऊन येतांनाची रांग पहायला मिळत आहे. शासनाकडून बंदी असलेल्या गुटखा मोठ्या प्रमाणात सुरू असताना अन्न व औषध विभागाकडून गेल्या दोन वर्षात एकही कार्यवाही ली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आज पर्यंत सदर विभागाने झरी तालुक्यात ढुंकूनही पाहिले नाही त्यामुळे कुठेतरी दाळ शिजत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
अखेर मुकूटबन पोलिसांना गुप्त महिती मिळल्या वरून १० मार्च रोजी सकाळी मांगली येथील छत्रपती निखार वय ३२ वर्ष यांच्या घरी छापा मारला असता मजा,विमल,ईगल व हुक्का नामक गुटखा किंमत ३४ हजार ८५५ रुपयांचा मिळून आला. गुटखा जप्त करून आरोपीसह पोलीस स्टेशन ला आणले. आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमने2011 चे कलम 26(2), कलम 27, कलम 30 (2)(अ) तसेच भारतीय दंड विधान चे कलम 188, उपरोक्त आदेशा अन्वये विषारी अन्न पदार्थाचा विक्रिकरीता साठा व वाहतुक करुन भादंवि चे कलम 272,273, 328 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
ही कार्यवाही ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान,मोहन कुममेथे,खुशाल सुरपाम,संदीप कुमरे, मोहन कुडमेथे, संजय खांडेकर,दिलीप जाधव,पुरुषोत्तम घोडाम,संदीप बोरकर यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान संदीप कुमरे व संजय खांडेकर करीत आहे.
