
प्रतिनिधी: नितेश ताजने
पॉझिटिव्ह रुग्णाने पानटपरी सुरु करुन चक्क ग्राहक करत असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील मानकी गावात समोर आला आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून आता कोरोनाला रोखायचे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला असुन गावात रुग्न वाढण्याची भीती निर्मान झाली आहे.
शनिवारी ३ एप्रिल रोजी मानकी येथे कोरोनाचे तब्बल १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले होते. परिणामी आरोग्य विभागाने मानकी गावात धाव घेऊन संबंधित पॉझिटिव्ह रुग्णांना वणीतील कोविड रुग्णालयात भर्ती करण्यासाठी दोन मोठ्या अंँबुलन्स बोलाविल्या होत्या परंतु पॉझिटिव्ह रुग्णांसह नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्यांना गृह कोरंटाइन करण्यात आले. यावेळी आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णांकडून हमी पत्र लिहून घेतले की, पॉझिटिव्ह रुग्ण हे घराच्या बाहेर पडणार नाही, कोणाच्या संपर्कात येणार नाही, नियमाचे पालन करणार, नियमांचे पालन न केल्यास व गुन्हे दाखल झाल्यास पॉझिटिव्ह रुग्ण स्वता जबाबदार राहील, असे हमी पत्र आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी पॉझिटिव्ह रुग्णांकडून लिहुन घेतले आणि दोनही अंँबुलन्स घेऊन खाली हाताने वापस गेले. धक्कादायक बाब म्हणजे थोड्यावेळातच सदर पॉझिटिव्ह रुग्ण चक्क गावात,सार्वजनिक ठिकाणी फिरायला लागले तर एका पॉझिटिव्ह रुग्णाने चक्क आपली पानटपरी सुरु करुन ग्राहक करत आहेत. या धक्कादायक प्रकाराला जबाबदार कोण? सदर पॉझिटिव्ह रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे गावात कोरोनाचा संसर्ग पसरुन रुग्ण वाढण्याची भीती निर्मान झाली आहे. गावात पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्यास जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले असुन हि लढाई फक्त प्रशासनाची नाही तर प्रत्येक नागरीकांची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करने गरजेचे झाले आहे.
