
वरोरा तालुक्यातील बोर्डा गावाटलगत असलेल्या आराध्या लॉन च्या मागील भागात असलेल्या एक विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
हिरालाल कनिष्ठ विद्यालय 12 वित शिक्षण घेणारी अनन्या चिमुरकर या विद्यार्थिनीने 12 वि चे दोन पेपर दिले.चार पेपर शिल्लक असताना या विद्यार्थिनीने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने आत्महत्या केली.ज्या वेळेस अनन्याने आत्महत्या केली त्या वेळेस तिची घरी आई घरकाम करण्यात व्यस्त होती.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहे.
