
वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेचा स्तुत्य उपक्रम
वणी :- गोरगरीब वयोवृद्ध, विधवा माता बघिनी व दिव्यांगासाठी असलेल्या निराधार योजनेचा आता वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून गावोगावी मोफत मार्गदर्शन शिबिर राबवून या योजनेला लोकाभिमुख चळवळ लवकरच बनवणार असल्याचे मत शेतकरी तक्रार निवारण केंद्राजवळ ता. १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उपस्थित निराधारांना व्यसनमुक्तीची शपथ देताना व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून संयुक्त रित्या एक दिवस निराधारांसाठी असा स्तुत्य उपक्रम चालू केला असून या उपक्रमांतर्गत शेकडो वंचित निराधारांना शासनाच्या योजनेत आणून त्यांना जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा स्तुत्य उपक्रम राबविण्याचे कार्य वंचितचे तालुकाध्यक्ष व श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी हाती घेतले असल्याने गावागावातून प्रचंड मोठा प्रतिसाद देखील प्राप्त होत असल्याने या उपक्रमाला या लोकचळवळ म्हणून राबविण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. ता १४ मार्च रोजी सावंगी, मोहदा, शिरपूर बेलोरा, इत्यादी गावातील ५१ लोकांचे निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्याच बरोबर सर्व्ह निराधारांना व्यसनमुक्त राहण्यासाठी शपथ ही देण्यात आली आहे. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदना घेऊन सर्व निराधारांना गावोगावी रवाना करण्यात आले. यात निराधार योजनेला व्यसनमुक्तीची साथ मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या या स्तुत्य उपक्रमाचा प्रभाव जनमानसात चांगलाच पडत आहे. त्यामुळे दिलीप भोयर यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. यावेळी वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शराध्यक्ष किशोर मुन, शिरपूरचे सरपंच जगदीश बोरपे, उपसरपंच मोहित चचडा, गणेश डाहूले सावंगीच्या सरपंच्या सौ.शालूताई ठाकरे, उपसरपंच ज्ञानेश्वर आत्राम, चिंचोलीच्या सरपंच्या सौ.शालिनीताई सलाम, मोहद्याच्या सरपंच्या सौ. वर्षाताई राजूरकर, उपसरपंच सचिन रासेकर, शिवणीचे उपसरपंच प्रमोद हनुमंते बेलोरा येथील अनिल खोब्रागडे, ग्रा.पं. सदस्य पाचभाई सुभाष परचाके, लता फेतफुलवार आदि उपस्थित होते असून या उपक्रमाला तहसील कार्यालयाचे तहसीलदार निखिल धुरधळ नायब तहसीलदार विवेक पांडे, रामचंद्र खिरेकर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. एल. सुलभेवार व सर्व गावातील तलाठी यांनी सहकार्य केले.
