
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन
तालुका प्रतिनिधी/२९ मार्च
काटोल – विद्यार्थ्यांना जीवनातील कोणत्याही परीक्षेत सुयश प्राप्त करायचे असेल तर शिवतंत्राचा वापर करा.आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात रिस्क आहे म्हणून न घाबरता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश विद्यार्थ्यांना आमदार अमोल मिटकरी यांनी जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे दिला.
कार्यक्रमाला जि.प.सदस्य सलील देशमुख, माजी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर वाडबुधे, पं.स.सदस्य संजय डांगोरे, पं.स.सदस्य निशिकांत नागमोते प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे मिटकरी म्हणाले, विद्यार्थ्यांनी दैववादावर विश्वास न ठेवता. प्रचंड परिश्रम करावे यश नक्की मिळेल.समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अधिकारी व्हा.जीवनात नैराश्य आले तर शिवचरित्र वाचा.त्यातून मार्ग नक्की मिळेल.
यावेळी, उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आदित्य बाभूळकर व स्वर्णा कोटजावळे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, संचालन केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया यांनी केले.
