
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील बहुतांश गावात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला नाही.काही गावात घरकुल चे जीओ टॅग अजून झाले नाही, तसेच रजीस्ट्रेशन होणे बाकी आहे.पहील्या टप्प्यातील घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता त्वरित दिल्यास पावसाळ्यापूर्वी घरकुल बांधणे शक्य होईल.याकरीता राळेगाव तालुका सरपंच संघटनेचे वतीने गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी राजुभाऊ तेलंगे सरपंच रावेरी, सुधीरभाऊ जवादे सरपंच कीन्ही जवादे , गजाननराव निकुडे, देवेंद्रजी उईके,व अनेक गावांतील घरकुल लाभार्थ्यी हजर होते.
