मी स्वतःला आमदार समजून नाहीतर कार्यकर्ता म्हणून काम करतो-: आमदार समीरभाऊ कुणावार यांचे प्रतिपादन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२२ समुद्रपुर यांच्या व्दारा आयोजित परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार म्हणाले की देशाचे संविधान हे सर्वोच्च असून मी नेहमी संविधानवर चालण्याचा प्रयत्न करतो.समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत मदत पोहचविण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो
मी स्वतःला आमदार समजून नाहीतर कार्यकर्ता म्हणून काम करतो
ते पुढे म्हणाले की समुद्रपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातून शहरातील व परिसरातील युवक युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करावी वाचनालयाच्या माध्यमातून अनेक युवक युवतीना शासकीय नोकरी प्राप्त झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले व आयोजकांनी सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार मानले याप्रसंगी प्रा.मेघश्याम ढाकरे,अशोक रामटेके,महाकाळे सर, म्हस्के सर,शिला सोनारे, विक्की बारेकर आदी मान्यवर पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.